'कॉलेजजीवन'

शाळा पूर्ण  झाली  आणि एका नवीन प्रवासासाठी मी तयार झाली. मनात खूप नवीन स्वप्न मी  रंगवलेली होती . माझ्या मनात काही भीती पण होत्या.  शाळेतल वातावरण खूप  वेगळं  होतं. शिक्षक थोडे कडक होते. आता कॉलेज  मध्ये सगळं कसं असणार याची सतत मनात धास्ती होती आणि नवीन जग हे कसं असेल त्या बद्दल मनात मी खूप कल्पना पण केल्या होत्या .
          आता मला युनिफोर्म  घालायची बंदी नाही दोन वेण्या घालायचं  बंधन नाही. पाहिजे तसं  तयार  होऊन  मी जाऊ शकत होती. मला जे काही नवीन स्वातंत्र्य  मिळणार होतं त्या साठी मी खूप आनंदात होती पण मी हे विसरली होती कि स्वातंत्र्या बरोबरच माझ्यावर नवीन जवाबदारी पडेल,मला स्वतःला जास्त हुशार,पाकट  बनवायला लागेल. अभ्यासा बरोबर मला इतर प्रव्रुतित पण भाग घ्यायला लागेल. एकट प्रवास करणं, पैसे संभाळणं ,हिशोब ठेवणं ,स्वतःची वस्तू संभाळणं हे सगळं  मला हळू हळू समजलं.जेवढं हे सगळं सोपं वाटतं  तेवढं ते सोपं नाही. आपले आई वडील किती कष्ट करतात त्याची मला आता जाण  झाली .
         कॉलेजजीवन  खूप चांगलं  आहे पण जसे जसे आपण स्वातंत्र्य मिळवतो तसे आपण वास्तविकतेच्या फार जवळ येत जातो आणि खर जग हे कसं असतं त्याची आपल्याला तेंव्हा  खरी ओळख  होते. स्वातंत्र्या बरोबरच जवाबदारी पण आपल्या पदरी पडते आणि आता पर्यंत आपल्या साठी जे निर्णय आई वडील घेत होते ते आता वेळ पडल्यास आपल्याला घ्यावे लागतात. आपल्या निर्णयशक्तिवर आपलं भविष्य अवलंबून असतं. एक चुकीचा निर्णय आणि सगळं उलटपालट होतं म्हणून सतत चांगल्या मित्रांच्या सोबत राहणं ,चांगल्या पुस्तकाचं वाचन करणं  खूप गरजेचं आहे त्यामुळे आपले विचार चांगले राहतात आणि आपण मनानी खूप भक्कम-द्रुढ  बनतो जे आपल्याला चुकीचा निर्णय घेउच  देत नहि. आपण सतत प्रगतीपंथावर पुढे पाउल मांडत सरकत जातो ,अगदी न थकता ,न हारता -------! . 

Comments

Popular posts from this blog

'કવિતા'

The Best Surprise

इतिहास